नवी दिल्ली । कर्नाटकमधील काँग्रेस संकटमोचन म्हणून ओळख असलेले डीके शिवकुमार यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात ईडीने काल ( ३ सप्टेंबर)अटक करण्यात आली आहे. चौकशी करता ही अटक झाल्याचे ईडीने सांगितले. ईडी आज (४ सप्टेंबर) शिवकुमार यांना न्यायालयात हजर करणार आहेत. सुनावणीवेळी ईडीकडून शिवकुमार यांच्या कोठडीची मागणी केली जाईल. ईडीने शिवकुमार आणि नवी दिल्लीतल्या कर्नाटक भवनमधील कर्मचारी हनुमनथैया यांच्यासह अन्य काही जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
Karnataka Congress has called a statewide protest tomorrow, against the arrest of party leader DK Shivakumar by Enforcement Directorate. (file pic) pic.twitter.com/gjIRkJAg7u
— ANI (@ANI) September 3, 2019
अटकेनंतर शिवकुमार यांनी ट्विटरद्वारे केंद्र सरकारविरोधातला संताप व्यक्त केला आहे. शिवकुमार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मी माझ्या भाजपमधील मित्रांचे अभिनंदन करु इच्छितो, कारण मला अटक करण्याचे त्यांचे मिशन अखेर यशस्वी झाले आहे. माझ्याविरोधातील आयटी आणि ईडीची प्रकरणे ही राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आली आहेत. मी त्यांच्या राजकारणाचा शिकार आहे.”
I congratulate my BJP friends for finally being successful in their mission of arresting me.
The IT and ED cases against me are politically motivated and I am a victim of BJP's politics of vengeance and vendetta.
— DK Shivakumar (@DKShivakumar) September 3, 2019
डी. के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता ईडीच्या फेऱ्यात सापडल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.