HW News Marathi
राजकारण

ईडी-सीबीआयचे अधिकारी मोदी-शहांचे कार्यकर्ते !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यापाठी ईडी, सीबीआयचा ससेमिरा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “देशात आणिबाणीपेक्षाही अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ईडी, सीबीआयचे अधिकारी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच काम करीत आहेत”, अशी गंभीर टीका टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देखील राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे. “विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शरद पवार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी कोणताही संबंध नसताना शरद पवार यांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

घटकपक्षांकरिता ५० जागांच्या मागणीवर ठाम !

राजू शेट्टी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाबाबत देखील भाष्य केले आहे. “येत्या २ दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तोडगा निघेल”, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस-राष्ट्रवादीने घटपक्षांकरिता ३८ जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र आम्ही आघाडीतील घटकपक्षांना ५० जागा सोडण्याची मागणी केली असल्याची माहिती देखील राजू शेट्टी यांनी दिली आहे. आम्ही ५० जागांच्या मागणीवर ठाम असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न किताबाने गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk

“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको,” मुख्यमंत्र्यांचे आदेश

Aprna

लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक

News Desk