मुंबई | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतली आहे. शिंदेंनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदेंचा शपथ विधीसोहळा राजभवनात पार पडला. “माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो,” म्हणत शिंदेंनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदेंना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची आज (30 जून) शपथ घेतली आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री शपथ घेतना त्यांच्या समर्थनकांनी मोठमोठ्या घोषणा देत आनंद व्यक्त केला आहे.
Mumbai: Eknath Shinde takes oath as the Chief Minister of Maharashtra pic.twitter.com/F7GpqxGozq
— ANI (@ANI) June 30, 2022
तब्बल दहा दिवसांनतर शिंदे हे आज मुंबईत दाखल झाले. यानंतर शिंदेंनी सर्व प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. यानंतर शिंदे आणि फडणवीसांनी राजभवनात जावून राज्यपालांची भेट घेतल्यानं दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याची घोषणा केली. होती.
शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांना अभिनंदन केले आहे. पंतप्रधान ट्वीटमध्ये म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर अभिनंदन करू इच्छितो, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर जे तळागाळातील नेता, तो आपल्यासोबत समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव घेऊन येतो. महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी ते काम करतील असा मला विश्वास आहे.”
I would like to congratulate Shri @mieknathshinde Ji on taking oath as Maharashtra CM. A grassroots level leader, he brings with him rich political, legislative and administrative experience. I am confident that he will work towards taking Maharashtra to greater heights.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022
संबंधित बातम्या
मोठी बातमी! एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.