लखनऊ | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान सतत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती या दोन्ही नेत्यावर निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलत प्रचार बंदी घातली आहे. तसेच भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लिली शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मनेका गांधी या दोन्ही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल घेत, या दोघांवर निवडणूक आयोगाने प्रचार बंदी घालण्यात आले आहे.
Election Commission bars Union Minister and BJP leader Maneka Gandhi from election campaigning for 48 hours starting from 10 am tomorrow, for violating Model Code of Conduct during her election campaign held in Sultanpur. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/XIFzCm2pQC
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 15, 2019
निवडणुकीच्या प्रचारादम्यान दिग्गज नेते एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतात. त्यावेळी नेते मंडळीत त्यांच्या भाषणादरम्यान पातळी ओलांडतात. या नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. आयोगाने काल (१५ एप्रिल) योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तास अर्थात तीन दिवस आणि मायावती यांच्यावर ४८ तास अर्थात दोन दिवसांसाठी प्रचारबंदी करण्यात आली आहे.
Election Commission bars Samajwadi Party (SP) leader Azam Khan from election campaigning for 72 hours starting from 10 am tomorrow, for violating Model Code of Conduct during his election campaign held in Rampur. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/a9GJl385Kk
— ANI (@ANI) April 15, 2019
आजम खान आणि मेनका गांधी यांची वादग्रस्त विधान
रामपूर वासियो, उत्तर प्रदेश वासियो आणि देशवासियो ज्यांना चेहरा ओळखायला तुम्हा १७ वर्षे लागली. मी त्यांना १७ दिवसात ओळखले, असे अश्लील शब्दात आझम खान यांनी अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर टीका करताना वापरले. आझम खान मंचावर भाषण करत असताना त्यावेळी व्यासपीठावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत “मी निश्चित जिंकून तर येणार, मात्र माझा विजय मुस्लीम जनतेशिवाय असेल तर मला वाईट वाटेल. ज्यावेळी मुस्लीम नागरिक कामानिमित्ताने माझ्याकडे येतील, त्यावेळी मला त्यांचा विचार करावा लागेल. निवडणुकीतील माझा विजय हा तुमच्या सहकार्याने होईल किंवा तुमच्या सहकार्यशिवाय होईल, असे मनेका गांधी यांनी एक प्रचार सभेत म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.