HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ तर विरोधकांबाबत कठोर भूमिका घेते !

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (४ मे) केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. “केंद्रीय निवडणूक आयोग हे सध्या पक्षपातीपणाने वागत आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ तर विरोधकांबाबत कठोर भूमिका घेत आहे”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशातील अनेक स्वायत्त आणि अत्यंत महत्त्वाच्या संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हटले होते. निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा याचाच परिणाम आहे. निवडणूक आयोगाने आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडणे आवश्यक आहे. मात्र तसे चित्र दिसत नाही”, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालय आज दुपारनंतर देणार निर्णय

News Desk

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी होणार

Aprna

लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करतात !

News Desk