HW News Marathi
राजकारण

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

मुंबई |  महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या (Andheri East Assembly by-election) एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

 

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे 

१.  ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

५. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६. चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७. चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८. निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९. नीना खेडेकर (अपक्ष)

१०. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११.  फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२.मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१४. शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष).

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले की, आज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच  १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा !

News Desk

‘गोपालगंज ते रायसीना’ असे लालू यादवांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे !

News Desk

आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर…सरकार दिशाभूल करतेय !

News Desk