HW News Marathi
राजकारण

…तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा !

मुंबई | राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे शिवसेनेकडून “मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार” असा दावा केला जात असताना दुसरीकडे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल”, असे विधान करत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. याच वक्तव्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “सच्चा शिवसैनिक रोज खोटं बोलत नाही. सच्चा शिवसैनिक आपल्या शब्दाला, वचनाला जागतो. सच्चा शिवसैनिक खुर्चीसाठी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही”, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.

“शिवसैनिक आहे असे म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा. शिवसैनिक नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो. तो चुकीच्या मार्गावर चालत नाही. असे उपमा, अलंकार वापरून राजकारण होत नाही. तसे असेल तर आमच्याकडे पण मोदी आणि शाह आहेत. देवेंद्र फडणवीसांना सांगा शिवसेनेत प्रवेश करा. सच्चा शिवसैनिक रोज खोटं बोलत नाही, सच्चा शिवसैनिक आपल्या शब्दाला, वचनाला जागतो, सच्चा शिवसैनिक खुर्चीसाठी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही. जर स्वतः शिवसैनिक म्हणवत असाल तर शिवसैनिकांचे संस्कारही समजून घ्यावेत. आमच्यावर ‘जाए पर वचन न जाए’ असे बाळासाहेबांचे संस्कार आहेत”, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो, जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू !

News Desk

शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करा !

News Desk

#LokSabhaElections2019 : बिहारच्या महाआघाडीचे जागावाटप जाहीर

News Desk