HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…धुळे मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. आपण ज्या नेत्याला पक्षाला मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाचे असते. महाराष्ट्रातील मतदानाचे २ टप्पे पार पडले आहेत. तर आज (२३ एप्रिल) तिसरा टप्पा देखील पार पडत आहे. आता केवळ महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे. हा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडेल.

आज आपण जाणून पाहणार आहोत चौथ्या टप्यातील धुळे मतदार संघाबाबत. धुळे लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

यंदा धुळे मतदार संघातून भाजपकडून डॉ. सुभाष भामरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुणाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २८ उमेदवार धुळ्यामधून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

धुळ्यामध्ये २०१४ ची स्थिती

धुळ्यामधून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. सुभाष भामरे, कॉंग्रेसकडून अम्रिशभाई पटेल हे लोकसभेच्या मैदानात उतरले होते. त्यापैकी भाजपच्या सुभाश भामरे यांना ५,२९,४५० इतकी मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या अम्रिशभाई पटेल यांना ३,९८,७२७ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर १,३०,७२३ इतक्या मतांनी भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव झाला होता. तर बसपच्या योगेश इशी यांना ९,८९७ इतकी मतं मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पहिली तर भाजपला ३१ %, कॉंग्रेसला २३ % आणि बसप केवळ १ टक्का मतं मिळाली होती.

धुळे मतदारसंघातील मतदारांची संख्या

धुळ्यामध्ये १८,७४,३१० इतकी एकूण मतदार संख्या आहे. येथे ८,९५,८७५ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. तर ९,७८,४३५ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत

धुळ्याचा इतिहास पहिला तर धुळे हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हापासून भाजपने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यश मिळवले आहे. या मतदारसंघात मराठा, पाटील आणि मुस्लिम जनसंख्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर गेल्या ५ वर्षात येथील विविध विकास कामांना पूर्ण करण्यासाठी भाजपच्या डॉ.सुभाष भामरे यांनी बरेच प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. भूयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजना, सिंचनाची विवध कामे त्यांनी मार्गी लावले असल्याची सांगितले जाते. मात्र अजूनही अनेक समस्या या मतदार संघात आहे. तर यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कुणाल पाटीलसुद्धा जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे. विकासाच्या मुद्यावरच धुळे लोकसभा मतदार संघाची आजवरची निवडणूक झाली आहे. धुळे लोकसभा मतदार संघात आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षात खरी लढत झाली आहे. मात्र २००९ मध्ये १५ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर आजतागायत भाजपचा झेंडा फडकत आहे. यंदाची ही लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएकडे म्हणजे काही गोष्टी लपवायच्या आहेत !

News Desk

“आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाही तर…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

Aprna

…म्हणूनच काँग्रेसची अधोगती होत आहे !

News Desk