HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…नांदेड मतदारसंघाबाबत

नांदेड | महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता फक्त तीन टप्पे शिल्लक राहिले आहे. महाराष्ट्रातील १० मतदारसंघात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी नांदेड हा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदार संघा मानला जातो. नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, आणि मुखेड यांचा समावेश होतो.

या मतदार संघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघडीचे यशपाल भिंगे निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत. समाजवादी पार्टीचे अब्दूल सामद अब्दुल करीम यांच्यासह इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १४ उमेदवार नांदेडमधून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

नांदेडमधी २०१४ ची स्थीती

नांदेड मध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नांदेडमधून कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे डी.बी पाटील, तर बीएमयुपी या .पक्षाचे राजरत्न आंबेडकर उभे होते. त्यापैंकी कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा ४,९३,०७५ इतकी मते मिळून विजय झाला होता. तर भाजपच्या डी.बी. पाटील यांना ४,११,६२० इतकी मत मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पाहायला मिळाला. तर ८१,४५५ इतक्या फरकाने भाजपच्या डी.बी पाटील यांचा पराभव झाला होता. तर बीएमयुपी या पक्षाच्या राजरत्न आंबेडकर यांना २८,४४७ इतकी मते मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास कॉंग्रेसला २९ ट्क्के, भाजपला २४ टक्के, आणि बीएमयुपी ला केवळ १ टक्का मते मिळाली होती.

अशोक चव्हाणांना तगडी टक्कर

नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता असून अशोक चव्हाण हे या मतदारसंघाती विद्यमान खासदार आहेत. कॉंग्रेसच्या विरोधकांनी कितीही तगडा उमेदवार दिला तरी त्यांना फरक पडणार नाही. इतकी चव्हाणांना इथे विजयाची खात्री निश्चित आहे. यंदा चिखलीकर यांच्या रूपाने अशोक चव्हाणांना या निवडणुकीत तगडे आव्हान मिळाले असल्याचे मत राजकीय विचारवंनी व्यक्त केले आहे.

नांदेडमध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व

स्थानिक पातळीवर प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अशोक चव्हाणांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तेव्हा यावेळी कॉंग्रेस आपला हा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होतो की, त्याला सुरुंग लागतो आहे की नाही हे निकालानंतरच कळेल.

नांदेडमधील एकूण मतदार

१७,००,९९१ तर याठीकाणच्या महीला मतदारांची संख्या आहे ८,७१,७९५ तर पुरुष मतदारांची संख्या ८,८३,१३८ इतकी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk

दिवाळी बोनससाठी पालिका कर्मचार्‍यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा

swarit

संसदेत मोदी १५ मिनिटे उभे रहाणार नाहीत | राहुल गांधी

News Desk