HW News Marathi
राजकारण

शिवसेना खासदार संजय राऊतांना ED चे समन्स

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठविला आहे. राऊतांना चौकशीसाठी उद्या (28 जून) सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश ईडीने दिला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊतांना समन्स बजावला असेल. शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह 50 आमदर पक्षासोबत बंड केले आहे. राज्यात गेल्या आठवड्या भरापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांना ईडीने नोटीस पाठविली आहे.

दरम्यान, १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. याआधी राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी ईडीने राऊतांचे ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता.

 

 

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला

संबंधित बातम्या
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ED कडून जप्त
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्लामपूर चे मैदान मोबाईल बॅटरीच्या उजेडाने उजळून निघाले

swarit

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…

Aprna

नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयातून पूरपरिस्थिती हाताळावी! –छगन भुजबळ

Aprna