नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (२९ एप्रिल) पश्चिम बंगालमधील सेरांपोर येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेदरम्यान मोदी म्हणाले की, “दीदी, २३ मे रोजी जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येतील. तेव्हा संपूर्ण देशभरात सर्वत्र कमळ फूलेल चित्र दिसून येत होते. त्यावेळी तूमचे आमदार तुम्हाला सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील. आज देखील तुमचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत.” असा गौप्यस्फोट मोदींनी केला आहे. मोदींच्या गौप्यस्फोटाने बंगाच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बनर्जी देशाच्या राजकीय वर्तुळा भूकंप आला आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi in Serampore, West Bengal: Didi, on 23 May when the results will come, lotus will bloom everywhere and your MLAs will leave you. Even today, didi, 40 of your MLAs are in contact with me. pic.twitter.com/XaZQ4BORwO
— ANI (@ANI) April 29, 2019
भाजपचा पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २५ लोकसभेच्या जागांवर डोळा आहे. पंतप्रधान मोंदींच्या ४० आमदार संपर्कात असलेल्या विधानावर तृणमूल काँग्रेसचे नेते ड्रेक ओब्रायन यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, आमच्या पक्षातील एक ही खासदार तुमच्यासोबत जाणार नसून आपण निवडणुकीच्या प्रचार करत आहोत, घोडेबाजाराचा नाही. लवकरच तुमचा एक्सपायरी डेट जवळ आली आहे. तसेच तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Derek O'Brien, TMC on PM's remark "40 TMC MLAs in contact with me": Expiry Babu PM. Nobody will go with you, not even 1 councilor. Are you election campaigning or horse trading, your expiry date is near. Today, we are complaining to EC. Charging you with horse trading. (file pic) pic.twitter.com/mLkaMq8AwZ
— ANI (@ANI) April 29, 2019
तृणमूल काँग्रेसने २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी तब्बल २११ जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवली होती. याचबरोबर लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे ३४ खासदार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.