HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रासह देशभरात ‘या’ दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

मुंबई | देशभरात आज (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रातील जालना, बारामती, जळगाव, रावेर, औरंगाबाद, रायगड, पुणे, माढा, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, हातकणंगले या अत्यंत महत्त्वाच्या अशा १४ मतदार संघांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. या टप्प्यात राज्यातील तसेच देशातील दिग्गज राजकीय नेत्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. म्हणूनच भारतीय निवडणूक आयोगाने तिसऱ्या टप्प्यातील सर्वच मतदार संघात चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसभा मतदार संघ

शिवसेना/भाजप

काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव उन्मेष पाटील (भाजप) गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर रक्षा खडसे (भाजप) डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)
जालना रावसाहेब दानवे पाटील(भाजप) विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबाद चंद्रकांत खैरे (शिवसेना) सुभाष झांबड (काँग्रेस)
रायगड अनंत गीते (शिवसेना) सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
पुणे गिरीश बापट (भाजप) मोहन जोशी (काँग्रेस)
बारामती कांचन कुल (भाजप) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
अहमदनगर सुजय विखे पाटील (भाजप) संग्राम पाटील (राष्ट्रवादी)
माढा रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सांगली संजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वाभिमानी)
सातारा नरेंद्र पाटील (शिवसेना) उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना) नवीनचंद्र बांदोडकर (काँग्रेस)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना) धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना) राजू शेट्टी (स्वाभिमानी)

राज्यात बहुचर्चित अशा जालना मतदारसंघातून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील तर गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा, वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशा अनेक बहुचर्चित नेत्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांची भेट

News Desk

मी तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, सिद्धूंचा पंतप्रधानांवर निशाणा

News Desk

शहा-फडणवीस भेटीत मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा ?

Gauri Tilekar