HW News Marathi
राजकारण

हिंगोलीमध्ये भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

हिंगोली | हिंगोलीतील गारमाळ भागात भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरून हाणामारी झाली आहे. यात १५ कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचे एक पथक गारमाळमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तहसील पथकाचा पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली.

यानंतर भाजप कार्यकर्ते हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहेलवान या दोन गटात तणाव निर्माण झाला. भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांशी परस्पर वादविवाद झाला. यानंतर दोन्ही गटांत लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारी झाली. याशिवाय दगडफेक सुद्धा करण्यात आली.

दरम्यान, या घटनेत ११५ जण जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, गारमाळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसची स्तुती, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

Gauri Tilekar

“शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणाला भाजपचा पाठिंबा…”, सामनाच्या रोखठोकमधून शिंदेंवर टीका

Aprna

#LokSabhaElections2019 : तृणमूल काँग्रेस देणार ४०.५ टक्के महिला उमेदवार

News Desk
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

भोपाळ | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशमध्य गेल्या १५ वर्षपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मेव्हणे संजय सिंह मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून चौहान यांना मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थिती संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मध्य प्रदेशात निवडणुकी चागंल्याच रंगात आल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. संजय यांनी भाजपवर घराणेशाही राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे.

राज्यात २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच १७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर लगेच भाजपला धक्का देत शिवराज सिंह चौहान यांचे मेव्हणे विरोधकांच्या गटा सामील झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Related posts

सरकारविरोधात बोलल्यामुळे पद्मश्री राहीबाई पोपेरेंचा भर कार्यक्रमात माईक केला बंद

Aprna

मराठा समाज राज्य सरकारवर नाराज, पुढील निर्णयासाठी घेणार बैठक

News Desk

MarathaReservation : दोन्ही सभागृहात चर्चेविना एकमताने विधेयक मंजूर

News Desk