भोपाळ | भाजपने मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची आज (२ नोव्हेंबर) पहिली यादी जाहीर केली आहे. १७७ जागांसाठी आज पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे बुधानीतून लढणार आहेत. यासोबतच मिझोरामच्या २४, तेलंगणाच्या २८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काल (१ नोव्हेंबर) दिवसभर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावावरून चर्चा झाली होती.
BJP releases first list of 177 candidates for Madhya Pradesh elections. CM Shivraj Singh Chauhan to contest from Budhni, state ministers Narottam Mishra and Yashodhara Raje Scindia to contest from Datia and Shivpuri respectively pic.twitter.com/FO8p2GIjt4
— ANI (@ANI) November 2, 2018
BJP has also released a list of 24 candidates for Mizoram and 28 candidates for Telangana assembly elections pic.twitter.com/bpMx4IXVQe
— ANI (@ANI) November 2, 2018
शिवराजसिंह हे यापूर्वी दोन जागांवरून निवडणूक लढणार असल्याचे वृत्त होते. परंतु , त्यांना बुधनी मतदारसंघच देण्यात आला आहे. तर शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री राहिलेल्या माया सिंह यांचा ग्वाल्हेर मतदारसंघातून वगळले आहे. तर माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांच्या गोविंदपुरा आणि माजी मंत्री कैसाश विजयवर्गीय यांच्या महू मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.