HW News Marathi
राजकारण

भाजप-शिवसेनेचं जमलंच ! हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा युती

मुंबई | आगामी निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या युतीबाबत संभ्रम कायम होता. शिवसेना-भाजपची युती होणार का ? या दोघांपैकी महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ठरणार ?, याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगात होत्या. मात्र, आता अखेर भाजप-शिवसेनेच्या युतीचा तिढा सुटला आहे. वारंवार स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसनेच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा भाजप-शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेसाठी शिवसेनेला २३ तर भाजपला २५ जागा तर विधानसभेसाठी ५०-५० जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (१८ फेब्रुवारी) संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षात भाजपसोबत असताना देखील शिवसेनेने कायमच विरोधी पक्षाची भूमिका बजावली. शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु, अखेर आगामी निवडणुकांसाठी हे दोन्हीही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

  • भाजप-शिवसेनेची युती व्हावी ही लोकांची भावना
  • दोन्ही पक्षांमधील हिंदुत्त्वाचा दुवा समान
  • आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-सेनेची युती
  • लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजप २५ जागांचा फॉर्म्युला
  • काही मुद्द्यांमुळे शिवसेना-भाजपमध्ये मतभेद होते
  • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही
  • भाजप-शिवसेनेची युती ही देशहितासाठी
  • नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, लोकांच्या मान्यतेनुसार होणार प्रकल्प
  • विधानसभेसाठी मित्रपक्षांना जागा देऊन उरलेल्या जागांमध्ये समान वाटप
  • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार, दुष्काळग्रस्त भागात दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकत्र दौरे

भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

  • राम मंदिराच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत
  • समज-गैरसमज बाजूला ठेऊन नवी सुरुवात करीत आहोत
  • स्थानिकांचा रोष पत्करून नाणार नको

भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अमित शाह काय म्हणाले ?

  • कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे
  • कोट्यवधी कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली
  • शिवसेना भाजपचा सर्वात जुना मित्र
  • युती सरकारने भ्रष्ट्राचार नष्ट केला
  • आमची युती ४८ पैकी ४५ जागा जिंकणारच
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांनाच विचारत आहेत !

News Desk

मी नेहमीच ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’च्या घोषणा देत राहिलो !

News Desk

माझे बोट धरुन राजकारणात आलेला माणूस इतका बदलू शकतो ?

News Desk