HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटा आहे. निवडणुकीसाठी ४८  जागांपैकी काँग्रेस – २४ तर राष्ट्रवादी – २०, बहुजन विकास आघाडी – १, स्वाभिमानी शेतकरी संघटना – २ आणि युवा स्वाभिमानी – १ महाआघाडीत अशाप्रकारचे जागावाटप झाले आहे. महाआघाडीचे जागावाटप झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राजू शेट्टी आदी नेते यावेळी उपस्थित होते.

महाआघाडीचे जागावाटप ठरले असले तरी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेत अनुपस्थिती चर्चा विषय ठरले. विखे-पाटील यांच्या राजीनाम्यावर देखील सस्पेंस कायम आहे.  विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे बंडखोरी करत भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यांना नगर दक्षिणमधून भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. सार्वत्रिक निवडणुकांसांठी या महाआघाडीत आणखीण काही पक्षांनी सामील व्हाव, पण भाजपकडून साम दाम दंड भेदाचे राजकारण करण्यात येते आहे. त्याला काही पक्ष बळी पडत असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

असे आहे महाआघाडीचे जागावाटप

  • काँग्रेस – २४
  • राष्ट्रवादी – २०
  • बहुजन विकास आघाडी – १
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना – २
  • युवा स्वाभिमानी – १

Related posts

#Election2019 : जाणून घ्या…चंद्रपूर मतदारसंघाबाबत

News Desk

उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, ‘लक्ष्मण किला’ येथे जाण्यासाठी रवाना

News Desk

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

News Desk