HW News Marathi
राजकारण

कोचिंग क्लासेसचे मालक आणि तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप कारण्यात आले आहेत. “कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे”, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणीबाबतच्या मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशीही मागणी यावेळी अनिल देशमुख यांनी केली.

“सुरतमध्ये लागलेल्या आगीसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही”, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. “कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे. “विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही”, असेही अनिल देशमुख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीची मनसेला साथ नाही

News Desk

श्री रामाला साकारणार शिल्पकार राम सुतार

News Desk

मराठा आरक्षणावरून तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चाकडून संताप

Aprna