HW News Marathi
राजकारण

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ११ जून रोजी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशनानुसार आज (१४ जून) धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा आहे. राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ११ जून रोजी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाची सुनावणी देखील आजच होणार असल्याची माहिती मिळत आहे. आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. “मी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो म्हणूनच जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर माझ्याविरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येत आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडेची टीका

News Desk

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

News Desk