HW News Marathi
राजकारण

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबई | दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी जैन समुदायाबद्दल आक्षेपार्य व्यक्तव केले होते. परंतु, मिलिंद देवरा यांनी यासंबंधी शिवसेनेला दोषी ठरवले होते. शिवसेनेच्या लिगल टीमने त्याचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिवसेनेकडून एलटी मार्ग पोलीस स्थानकात मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा आणि एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

“शिवसेनेने काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात जैन मंदिरासमोर मांसाहार शिजवत जैन धर्माचा अपमान केला होता,” असे विधान मिलिंद देवरा यांनी केले होते. देवरा यांनी भुलेश्वर येथील भाषणादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. यानंतर शिवसेनेने देवरा यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणुकीदरम्यान २ समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी आचारसंहितेचा भंगचा गुन्हा दाखल केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहा महिने होऊनही सरकारकडे असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही! – अजित पवार

Aprna

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ प्रस्ताव पास

News Desk

…तर अनिल अंबानी हे भाजपचे मालक !

News Desk