HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोठी घोषणा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ नोव्हेंबर)लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) व्याजावरच्या अनुदानाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी मोठ्या घोषणा करणार आहेत ही माहिती सूत्रांच्या सहाय्याने मिळाली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेने एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच रोजगार वाढण्यासाठी ही मदत होणार आहे.

व्याजावर निधी दिल्यास कर्जाचे दर कमी होतील आणि एमएसएमई क्षेत्रात कर्ज घेण्याचे प्रमाण वाढेल अशी माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेची लवकरच घोषणा करतील अशी गुप्त माहिती समोर आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय या प्रस्तावावर काम करत आहे. एमएसएमई सेक्टरमध्ये ६.३कोटींहून अधिक युनिट्स आहेत,आणि ११.१ कोटी लोकांना या युनिट्समधून रोजगार मिळतो. जीडीपीतही या क्षेत्राचे ३० टक्के योगदान आहे. ४५ टक्के भागीदारी उत्पादन क्षेत्रातही आहे. एमएसएमई युनिट्स समोर कर्जाची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे उद्योगाला उपयुक्त कर्ज अनुदानाच्या माध्यमातून मिळाल्यास या क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे म्हणूनच… !

Gauri Tilekar

अमृता फडणवीस यांचा ‘दीवानी मस्तानी’ गाण्यावर भन्नाट डान्स

News Desk
क्राइम

मोबाईल चोरामुळे तरुणीला एक पाय आणि हाताची बोटे गमवावी लागली

News Desk

मुंबई | तरुणीच्या हातावर काठी मारुन मोबाइल चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या मोबाईल चोरामुळे तरुणीला आपला एक पाय आणि हाताची काही बोटे गमवावी लागल्याची घटना सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडली. कल्याणला राहणारी द्रविता सिंहा (२३) नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लेडिज स्पेशल लोकल ट्रेन पकडली होती.

लोकलमध्ये प्रवास करत असताना द्रविताला फोन आला. पण, नेटवर्क नसल्यामुळे फोनवर बोलण्यासाठी ती दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ आल्यानंतर लोकलचा वेग कमी होताच प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलाने द्रविताच्या हातावर काठी मारली पण, अचानकपणे हातावर फटका बसल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. द्रविता ट्रॅकमध्ये पडलेली असताना दुसऱ्या लोकलने तिला धडक दिली. या अपघातात तिला आपला एक पाय आणि हाताची काही बोटे गमवावी लागली. याचा फायदा आरोपीने घेऊन मोबाईल घेऊन फरार झाला.

या घटनेनंतर द्रविताला गंभीर जखमा झाल्या असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. जीआरपीला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सॅणडहर्स्ट रोड आणि मस्जिद या स्थानकावरील सीसीटीव्ही फुजेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. अल्पवयीन आरोपी विरोधात हत्येचा प्रयत्न आणि चोरी करताना जाणुनबुजून इजा पोहोचवणे या गुन्हार्गत अलपवयीन आरोपीला अटक करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा द्रविताला प्रचंड धक्का बसला आहे.

Related posts

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

News Desk

आमदार रमेश कदम यांची पोलिसांना शिवीगाळ

News Desk

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

Manasi Devkar