HW News Marathi
राजकारण

रामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या, धर्मगुरुंचा योगींना सल्ला

नवी दिल्ली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाची २२१ फूट उंचीची मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली होती. मात्र योगींच्या या मूर्ती उभारण्याच्या संकल्पनेला धर्म संसदेतील साधू-संतांनी विरोध केला आहे. “श्रीरामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या. त्यासाठी प्रयत्न करा आणि हे करत असताना कुठलाही जातीयवाद करु नका”, असा सल्ला योगींना देण्यात आला आहे.

“आधीच देशभरात महापुरुषांचे भरपुर पुतळे आहेत. पुतळे महापुरुषांचे उभारले जातात देवाचे नाही. श्रीराम हे आपले दैवत आहेत. त्यामुळे श्रीरामाचे मंदिर उभारा पुतळा नाही”, असा सल्ला देखील सर्व संतानी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी २२१ फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीसाठी शरयु नदीच्या किनाऱ्यावरील जागाही निश्चित केली होती. महाराष्ट्रातील मुर्तीकार राम सुतार यांनी बनविलेल्या मुर्तीची प्रतिकृतीची निवड त्यासाठी करण्यात आली आहे.

वाराणसी येथे २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवसांत परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास १००८ संत-महंतांनी सहभाग घेतला. सध्याची हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार याबाबत या संसदेत चर्चा करण्यात आली. सोबतच राम मंदिर, गंगा नदीचे शुद्धीकरण आणि सनातन धर्म यांसारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. याच चर्चेदरम्यान श्रीरामांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याला संसदेतील संतानी विरोध केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकशाहीचा विजय व्हावा, इतकीच माझी इच्छा आहे !

News Desk

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसूनही खडसेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

News Desk
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

News Desk

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूरमधील हेलिकॉप्टर अपघातास पायलट जबाबदार असल्याचे विमान दुर्घटना पथकाने केलेल्या अहलवालात म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अतिरिक्त वजन असूनही पायलटने उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

२६ मे २०१७ रोजी लातूर येथील निलंग्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. सुदैवाने या अपघातात मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते. मुख्यमंत्र्यां या दौऱ्यात सकाळी हलगरा येथे श्रमदान केल्यानंतर औराद शहाजानीच्या शासकीय विश्रामगृहावर जेवण घेतल्यानंतर निलंग्यात येथून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाण्यास निघाले होते. मुख्यमंत्र्यांचे विमान जमिनीपासून सुमारे शंभर दीडशे फूट उंचीवर असताना या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बघातच क्षणी ते जमिनीच्या दिशेने वेगाने मैदानावर कोसळले.

तसेच अतिरिक्त वजनासह पायलटने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न केल्याने अपघात झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. यावेळी प्रवासी, सामान, इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. “पायलटने मोजलेले वजन ४,९४० किलो होते. परंतु न मोजलेल्या ७२ किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचे एकूण वजन सुमारे ५०७२ किलोंवर पोहोचलं होतं,” असे अहवालात म्हटले आहे

Related posts

“…वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar