HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच !

नवी दिल्ली | देशासह राज्यभरात एकीकडे सीएए आणि एनआरसीच्या कायद्यावरून वातावरण चांगलेच पेटलेले असताना आणि मोदी सरकार सध्या सर्व राजकीय पक्षांच्या निशाण्यावर असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच आहे”, असे मोठे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. “जी व्यक्ती भारताला स्वतःची मातृभूमी मानते, जी व्यक्ती भारताची भक्ती करते. जी व्यक्ती भारतावर प्रेम करते. ज्या व्यक्तीच्या जीवनात भारताच्या उदार संस्कृतीला महत्त्वाचे स्थान आहे. ती व्यक्ती कोणत्याही प्रांतातली असो, कोणाचीही पूजा करत असो ती व्यक्ती हिंदूच आहे”, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

हैद्राबादमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्प सभेत मोहन भागवत संबोधित करत होते. यावेळी, मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसी कायद्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर भाष्य केले. “सर्वांची प्रगती व्हावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, हा भारताचा परंपरागत विचार आहे. या विचाराला जग हिंदू विचार म्हणून ओळखते. आम्ही परंपरेने हिंदुत्ववादी आहोत. त्यात काहीही बदलण्याची आवश्यकता नाही. जी व्यक्ती भारतावर प्रेम करते. ती व्यक्ती कोणत्याही प्रांतातली असो, कोणाचीही पूजा करत असो ती व्यक्ती हिंदूच आहे”, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले. “काही लोक मात्र केवळ आपल्या वैयक्तिक स्वर्थासाठी आपल्याच लोकांमध्ये वाद निर्माण करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे भागवत यावेळी म्हणले.

Related posts

प्लॅस्टिकबंदीच्या दंडात्मक कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

धनंजय दळवी

धर्माच्या आधारे आरक्षण नाहीच !

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय.

News Desk