HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पुढची २५ वर्षे तरी मोदींना कोणीही धक्का देऊ शकणार नाही !

मुंबई | “मोदी हे वादळ आहे. देशात या वादळाला पुढची २५ वर्षे तरी कोणीही धक्का देऊ शकणार नाही”, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यासह केंद्रात पुन्हा एकदा केंद्र मोदी सरकार येईल, हे चित्र स्पष्ट आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

यंदाच्या “मोदींसमोर कोणीही टिकले नाही. मोदींनी २०१४ पासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांचा ना भूतो न भविष्यती असा विजय झाला आहे. विजयाची ही कमान पुढची २५ वर्षे तरी कायम राहणार आहे “, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. “भाजपच्या विजयाचा वारू विरोधकांना रोखता आला नाही”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

Related posts

नितीन गडकरी रुग्णालयात दाखल

News Desk

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

निवडणूक वर्षात ‘दारूकामा’चा जीवघेणा धंदा रोखण्याचा ‘जोश’ सरकार दाखविणार ?

News Desk