HW News Marathi
राजकारण

“मुख्यमंत्र्यांना नवस करणे आणि फेडण्यासाठी दिल्लीला जावे लागते”, उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई | “मुख्यमंत्र्यांना नवस करणे आणि फेडण्यासाठी दिल्लीला जावे लागते”, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा (26 डिसेंबर) सहावा दिवसशी उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेच्या कामकाजात सहभागी झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादच्या मुद्यांवरून विधानपरिषदेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी मागे सुद्धा बोललो की, मुख्यमंत्री हे हिंदुत्व माननारे आहेत. आणि म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणे आणि नवस फेडणे त्यांच्यासाठी दिल्लीला जावे लागते. आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय. उद्याचा दिवस नीट जाऊ द्या. म्हणून नवस करतोय, म्हणून त्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. पण, महाराष्ट्राचे भले कुठे, आज सुद्धा ते दिल्लीला गेले आहेत. ठिक आहे, त्याचे कारण काही असेल, एका मंत्री महोदयाने त्यांचे उत्तर दिले. त्यांचे कारण काही असेल,  त्यांच्याबद्दल आदर आहे. पण, ऐवढ्या दिल्लीवाऱ्यांमध्ये सीमाप्रश्नाचा मुद्दा कुठे आहे  आणि महाराष्ट्राचा हे कुठे आला.”

 विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही

सतत सभागृह बरखास्त होत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत. प्रत्येक वेळेला हिताचे प्रश्न काढल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे. विरोधी पक्षातील सदस्यांना बोलू दिले जात नाही. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रश्न मागे पडत आहे, ते प्रश्न तुम्ही उचलणार आहात का?, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “ते प्रश्न आम्ही नेहमी सभागृहात उचलतो.”

संबंधित बातम्या

“कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची मागणी

 

 

Related posts

ममता बॅनर्जींकडून रॉबर्ट वाड्रा यांची पाठराखण

News Desk

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार साहित्य संमेलनाचे उदघाटन

News Desk

भाजपच्या तिसऱ्या यादीतही खडसे, तावडेंना स्थान नाही

News Desk