HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

नुसती ‘फडणवीसी’ करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय! – उद्धव ठाकरे

मुंबई | “अत्यंत लाचार लाळघोटेपणा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री पद मिळाले. म्हणून नुसती फडणवीसी करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय”, अशा बोचऱ्या शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. सध्या रोशनी शिंदेंवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर उद्धव ठाकरेसह कुटुंब रोशनी शिंदेच्या भेटसाठी आज (4 एप्रिल) ठाण्यातील रुग्णालयात गेले होते. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्र्यांवर घाणाघात केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ” एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार लाळघोटेपणा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री पद मिळाले. म्हणून नुसती फडणवीसी करणारी माणूस गृहमंत्री म्हणून मिरवीत आहे. पण, त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मंदे गटाच्या आमदारांनी हल्ला केला. तरी सुद्धा कुठेही हल्ल्यला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चाचलेली आहे.”

सरकारच नपुसंक म्हटल्यानंतर कोणाकडून काय अपेक्षा करायची

उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका करताना नपुसंक अशा शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुसंक असा शब्द वापरला, असे मी ऐकले. आणि त्यांची प्रचिती ही काल आपल्याला आलेली आहे. सरकारच नपुसंक म्हटल्यानंतर कोणाकडून काय अपेक्षा करायची, हा मोठा प्रश्न आहे. या ठाण्याची ओळख शिवसेनेचे ठाणे. जिवाला जिव देणाऱ्या आणि महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघेंचे ठाणे, सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणे अशी ओळख आहे. आणि ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे, असे करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. आतपर्यंत मी गँग हा शब्द आपल्या सर्वांचा कल्पना आहे. पण, आता महिलांची गँग बनायला लागली आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या. तर मग आपल्या देश, राज्य आणि ठाण्याचे काय होणार. हा एक सर्व सामान्य ठाणेकरांच्या मनातील प्रश्न आहे. यांचा अर्थ असा नाही की, त्यांनी काही करावे आणि आम्ही ऐकून घ्याचे. आता म्हटले तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून देऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले. तर हे गुंड आणि तोतया शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत. त्यांना हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.”

यासारख्या महिला आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटल्यानंतर महिला गुंडांकडून हल्ले करविणाऱ्यांना नपुसंकच म्हणावे लागेल. दुर्दैव असे आहे, मी आपल्याशी भेटण्यापूर्वी आयुक्ता लयात गेलो तर आयुक्तच नाहीत. अजूनही कोणतीही तक्रार रोशनींनी पत्र दिलेले आहे. त्यात ज्या गुंड महिलांनी त्यांच्यावर हल्ला केलेला. होय, मी त्यांना गुंड महिलाच म्हणतोय. कारण, या अशा महिला आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या नाहीत. या महिलांची रोशनींनी नावे देखील दिलेली आहे. कोणी कोणी हल्ला केला, यांची नावे देखील दिलेली आहे. यानंतर व्हिडिओमध्ये सर्व रेकोर्ड झालेले आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे रोशनी मात्रूत्वासाठी उपचार घेत होती, ती हात जोडून त्यांना सांगत होती की, पोटात काही मारू नका, लांबू बोला. तरी सुद्धा रोशनींला पोटात लाता मारल्या. हे अत्यंत निरघून काम करणारी माणसे, ही ठाण्यात काय महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत. आयुक्त तर मला असे वाटते, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटले, सरकारचा एक घटक म्हणून त्यांच्याप्रमाणे आयुक्त वागतात की काय यांची मला कल्पना नाही. आयुक्तालयात गेल्यानंतर आयुक्तच नाही.

 

 

 

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

News Desk

बीजेपी से बेटी बचाओ

News Desk

एलबीएस मार्गावरील उघडे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता !

News Desk