HW Marathi
राजकारण

गणपती बाप्पा ‘ईडी’चे विघ्न नक्कीच दूर करेल !

मुंबई | ‘गणपती बाप्पा ‘ईडी’चे विघ्न नक्कीच दूर करेल,’ असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी  व्यक्त केला. कोहीनूर स्केअर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जोशींचा चिरंजीव उन्मेष जोशी यांची काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनलाय (ईडी)ची चौकशी झाली आहे. जोशींच्या घरी आज (२ सप्टेंबर ) गणेरायाचे भक्ती भावाने प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यावेळी जोशींनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती म्हटले आहे.

सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूरसाठी जागा खरेदी घेतली होती. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाले होते.  पुढे २००८मध्ये राज यांनी शेअर्स विकून या कंपनीतून अंग काढून घेतले होते.  मात्र त्यानंतरही राज या कंपनीत सक्रिय असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला.

 

Related posts

लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ‘सखी मतदान केंद्र’

News Desk

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk