HW News Marathi
राजकारण

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली विखेंची पाठराखण

रंगाबाद | विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यास पाणी देण्यास विरोध केला होता. मंगळवारी (३० ऑक्टोबर) केंब्रिज शाळा चौकात शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना काळे झेंडे दाखवले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भोवती गर्दी केली होती. या गर्दीत विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाविवाद झाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी विखेंची बाजू घेतली.

डॉ. काळे यांच्या घरी विखे पाटील आले आहेत हे समजताच राष्ट्रवादी युवक आघाडीचे कार्यकर्ते दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉ. काळे यांच्या घरी पोहचले. घरातून बाहेर पडत असताना माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्तांना नवीन घरे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची घोषणा

News Desk

मला खासदारकी सोडून बॅग भरून थेट जम्मू-काश्मीरला जावसं वाटतंय !

News Desk

राहुल यांच्या मुंबई दौ-याला सुरुवात

News Desk