नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी चांगलीच तापली आहे. यात आता माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्लीतील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर यांची उमेदवारी झटका मिळाला आहे. गौतम गंभीर यांनी नाव मतदार यादीत दोनवेळा नोंदनी केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी केला आहे. या प्रकरणी गंभीर विरोधात दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर १ मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Delhi's Tis Hazari Court to hear the matter on May 1. https://t.co/rbfSJ7hZ3y
— ANI (@ANI) April 26, 2019
गौतम गंभीर यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र आहेत. त्यातील एक मतदान ओळखपत्र राजेंद्र नगरमधील आहे, तर दुसरे मतदान ओळखपत्र करोल बागमधील अशी माहिती मार्लेना यांनी त्यांच्या तक्रारीत केली आहे. दोन मतदान ओळखपत्र ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे.
आतिशी यांनी ट्विटरच्या करत नागरिकांना सांगितले की, गौतम गंभीरला मतदान करुन आपले मत व्यर्थ करु नका असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘गौतम गंभीरला मतदान करुन आपले मदतान व्यर्थ करु नका. त्यांना लवकरच दोन मतदान कार्ड बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविले जाईल. आपले मतदान व्यर्थ करु नका.’
My appeal to the citizens of East Delhi Lok Sabha – pls don’t waste your vote by voting for @GautamGambhir; he is going to get disqualified sooner or later for having two Voter ID cards! अपना वोट व्यर्थ ना करें! #GambhirApradh pic.twitter.com/6bxGnT4n93
— Atishi (@AtishiAAP) April 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.