HW News Marathi
क्रीडा

गौतम गंभीर भाजपाकडून खेळणार का ?

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज गौतम गंभीर हा येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी भाजपाच्या बाजूने खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गौतम गंभीर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते. भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही काळापासून गौतम गंभीर भारतीय संघाबाहेर आहे. गंभीर ट्विटरवरून कायमच विविध मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. तसेच मोदी सरकारच्या अनेक निर्णयाला गंभीर याने बहुतांश वेळा जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. आम आदमी पक्षाला शह देण्यासाठी भाजपाचे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.

गंभीर यांची कारकीर्द

गंभीरने ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर आयपीएलच्या १५४ सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करत, कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या नेतृत्वात दोन वेळा आयपीएलचा किताब जिंकला. गंभीर २०१३ रोजी अखेरचा वनडे तर २०१६ रोजी अखेरचा कसोटी सामना खेळला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Asia Cup 2018 | हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर

swarit

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

News Desk

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk
महाराष्ट्र

नालासोपारा स्फोटके प्रकरणात श्रीकांत पांगारकरची आर्थिक मदत | सीबीआय

swarit

जालना | नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरातून महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक (एटीएस)ला अधिक स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या घरी सापडलेले स्फोटकांमागे श्रीकांत पांगारकरची मोठी आर्थिक मदत केली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने पुढील चौकशीसाठी पांगारकरला २६ तारखेपर्यंत सीबीआयच्या कोठडीत पाठविले आहे.

या प्रकरणात वैभव राऊत व्यतिरीक्त सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना एटीएसने ताब्यात घेतले. या तिघांच्या चौकशी दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात जालना शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक श्रीकांत जगन्नाथ पांगारकरला दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. पांगारकर हा २००१ ते २०१० काळात २ वेळा शिवसेनेचा नगरसेवक राहिला होता.

श्रीकांत पांगारकरचा अल्पपरिचय

शिवसेनेने श्रीकांत पांगारकर हा २००१ ते २००५ कालावधीत गणपती गल्ली आणि भाग्यनगर या भागातून निवडू आले होते. यानंतर २००५ ते २०१० मध्ये पुन्हा शिवसेनेच्या उमेदवारीवर ते शिवनगर भागातून नगरसेवक झाला होता. २०११मध्ये उमेदवारी न दिल्यामुळे श्रीकांत पांगारकर शिवसेने बाहेर पडले. यानंतर त्यांनी हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम सुरू केले.

Related posts

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

News Desk

राज्यपालांचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; राऊतांचा खोचक टोला

News Desk

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा; छगन भुजबळांची राज्य सरकारकडे मागणी

Aprna