पाटणा | भाजपचे वरिष्ठ नेते आणि बेगुसरायचे उमेदवार गिरिराज सिंह हे नेहमीच वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत आले आहेत. गिरीराज सिंह यांनी २४ एप्रिल रोजी बेगुसरायमधील जीडी महाविद्यालयात हे वक्तव्य केले होते. दरभंगाचे राजदचे उमेदवार अब्दुल बारी सिद्दिकी यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता त्यावर सिंह यांनी प्रसार माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया देतान वादग्रस्त विधान केले होती. सिंहा यांच्या या विधानानंतर बिहारचे विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने सिंह यांना नोटिस पाठवून याप्रकरणी उत्तर देण्यास सांगितले आहे.
Giriraj Singh had reportedly said "Who don't say Vande Mataram, can't worship motherland. My father and grandfather died by banks of Ganga and did not need a grave. But you need three-arm's-length of land. If you don't do it, the country will never forgive you' 2/2 https://t.co/vSXXAtzFOV
— ANI (@ANI) April 29, 2019
गिरीराज सिंह एका सभेत म्हणाले होते की, “जे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत ते आपल्या मातृभुमीची पूजा कशी काय करू शकतात? माझ्या वडिलांचा आणि आजोबांचा मृत्यू गंगेच्या किनारी झाला होता आणि त्यांना कबरची गरज नव्हती. परंतु ‘त्या’ लोकांना मृत्यूनंतरही तीन हात जमीन लागते. नंतरही तुम्ही असेच वागणार असाल तर देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.