HW News Marathi
राजकारण

प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्या, काँग्रेसची मागणी

मुंबई | गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकरणी निर्णय देण्यात आला नाही. तो तात्काळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लोकायुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

“ऑक्टोबर २०१८ मध्ये या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता हे प्रकरण अत्यंत गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात चौकशी सुरु होऊन २ वर्ष होत आली. यावर सुनावणी होऊन देखील ६ महिने झाले. पण अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष असल्याने आपण लवकरात लवकर याबाबतचा निर्णय द्यावा”, असे सावंत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडले ‘वर्षा’ निवासस्थान

Aprna

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

swarit