HW News Marathi
राजकारण

खिशात फाटलेले राजीनामे एकदा तरी द्या !

सासवड ।”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते निघाले राम मंदीर बांधायला,दुष्काळ पडलाये त्याच्यावर बोलायला वेळ नाही, आणि मंदीरे कुठली बांधता? जनसेवेतच ईश्वरसेवा आहे. शिसेना नेहमी सत्तेतून बाहेर परडण्याच्या गप्प मारते, परंतु अद्याप तरी सत्तेतून बाहेर पडलेली नाही. राजीनामे खिशात आहेत असे नेहमीच म्हणते, खिशात फाटलेले राजीनामे एकदा तरी द्या, बघुयात निवडणुकीत कोण कोणाबरोबर जाते ते दिसेलच”,अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल(२४ ऑक्टोबर) सासवड केली आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील नगरपालिका चौकातून तहसिल कार्यालयापर्यंत काल(२४ ऑक्टोबर) दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मोर्चाचे नेतृत्व करत असताना सुप्रिया बोलत होत्या. देशाबाहेरील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख येणार होते. शेतीमाल बाजारभाव पाडून शेतकऱ्यांचेच १५ लाख घालविले,अशी टीका केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु | संजय राऊत

News Desk

बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर; उद्या होणार वितरण

Aprna

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांवर गुन्हा दाखल

News Desk
मुंबई

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

Gauri Tilekar

मुंबई | मुंबईतील महत्त्वाच्या लालबहादूर शास्त्री मार्ग येथील या शीव ते मुलुंड मार्गाच्या रुंदीकरणात तब्बल १७०० दुकानदार रस्त्यावर आले आहेत. या प्रकरणी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरले गाळेधारकांकडे पालिका प्रशासन १९६२ चे पुरावे का मागता असा सवाल करत गाळेधारकांचा व्यवसाय बुडणार असल्याने त्यांचे पुनर्वसन व्यावसायिक संकुल बांधून करा अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे.

मुंबईतील एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामादरम्यान येणारी बांधकामे तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये मागील ४० वर्षापूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारकांचे गाळे तोडण्यात येत असल्याने पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या मार्गावरील एकूण दोन हजार बांधकामांपैकी तब्बल ८० टक्के बांधकामे व्यावसायिकांची असल्याचे त्यांनी सांगितले. यातील तोडलेल्या गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे गाळेधारक आता नगरसेवकांकडे धाव घेत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

या गाळेधारकांना मुंबईबाहेर हाकलण्याचा पालिका प्रशासनाला डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे रमेश कोरगावकर, राजूल पटेल, सदानंद परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही पालिका प्रशासनाचा गाळेधारकांना हद्दपार करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तर रस्ता रुंदीकरणात गाळेधारकांचा व्यवसाय बुडणार असल्याने त्यांचे पुनर्वसन व्यावसायिक संकुल बांधून करा अशी मागणी नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी केली. या प्रकरणी गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संबंधित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी खास धोरण तयार करा. असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी २००० सालापर्यंतचा नियम लावता मग वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांकडे १९६२ चे पुरावे कसे मागता असा सवालही त्यांनी केला आहे.

Related posts

पुण्याच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा

News Desk

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस

News Desk

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

News Desk