HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

परेश रावल ऐवजी हसमुख पटेल यांना भाजपकडून उमेदवारी

अहमदाबाद | बहुचर्चित अशा अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदार संघातून भाजपने अभिनेते आणि विद्यमान खासदार परेश रावल यांच्या जागी हसमुख एस पटेल उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये परेश रावल विजय झाले होते. परंतु निवडणुकीपूर्वीच परेश रावल यांंनी चार ते पाच महिन्यांपूर्वीच निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते.

हसमुख पटेल हे गुजरातमधील हमराईवाडी येथील आमदार आहेत. पटेल विधानसभेच्या २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत विजयी झाले होते. यानंतर पटेल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पासून ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Related posts

मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्रे गायब

News Desk

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी घेतली पर्रीकरांची भेट

News Desk

मोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले, तरीही त्यांचा निभाव लागणार नाही

News Desk