HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक अशी काँग्रेसची जागा असलेल्या अमेठी आणि केरळामधील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरून आपले नशीब आजमावणार आहेत. दोन जागांपैकी आज (४ एप्रिल) राहुल गांधी वायनाड या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उपस्थित असणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसने भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेसने नुकतेच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यावर आधारी राहुल गांधी २२ शहरात पत्रकार परिषद घेणार आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमध्ये उमेदवाराची घोषणा केली आहे. वायनाडमधून एनडीएचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना (बीडीजेएस) चे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

 

 

Related posts

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये ‘ब्लास्ट’

News Desk

पुढच्या कारवाईवेळी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना विमानाखाली बांधून न्यावे !

News Desk

ममता बॅनर्जींकडून रॉबर्ट वाड्रा यांची पाठराखण

News Desk