HW Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा उडता प्रचार

गुजरात | मकरसंक्रांत ही अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या मकरसंक्रांतमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राजकीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अमित शहासह गुजरातमधील आदी राजकीय नेत्यांची चित्र असलेले पतंगांची क्रेझ पाहायला मिळत आहे. तसेच या पतंगवर जगातील सर्वात उंच प्रतिमा असलेले यांची सरदार वल्लभभाई पटेल यांची “स्टॅचू ऑफ युनिटी”चे देखील पंतग आता बाजाारात पाहायला मिळणार आहे.

सध्या मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर अनोख्या पद्धतीने ठाकरेंच्या चहात्यांनी स्वत:या सिनेमाचे प्रमोशन करण्याचा निर्धार करून पतंग बनवून अनोख्या पद्धतीने सिनेमाचे प्रमोशन केले आहे. मुंबईतील डोंगरी परिसरातील ८० वर्ष जुन्या असलेल्या डोंगरी काईट सेंटर या दुकानात भगव्या रंगाची ‘ठाकरे’ असे लिहलेली पतंग बनविण्यात आली आहे.  तसेच बाजारात ट्रेडिंग बाहुबली सिनेमाच्या थीमवर पतंग तयार केले जात आहे. बाहुबली सिनेमातील लीड रोल साकारणारे अभिनेता प्रभाषसोबत अनेक कलाकारांचे फोटो यावर छापले आहेत

Related posts

किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न मिळाले ?

News Desk

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो !

News Desk