HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यातील सत्तांतरावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी; शिंदे गटाचा युक्तीवाद सुरू

मुंबई | राज्याच्या सत्तांतरवर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (15 फेब्रुवारी) सुनावणीचा दुसरा दिवस आहे. ठाकरे गटाकडून मंगळवारी (14 फेब्रुवारी) ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तीवाद केला तर आज शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे युक्तीवाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीनंतर हे प्रकरण पाच न्यायामुर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की सात न्यामुर्तींच्या घटनापीठाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे ऑनलाईनच्या माध्यमातून सत्तांतर सुनावणीला हजर आहेत. वकील हरीस साळवे, वकील नीरज किशन कौल आणि वकील महेश जेठमलानी अशा क्रमाने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करतील, असे सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता हे युक्तीवाद करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून मंगळवारी चार साडेचार तास युक्तीवाद झाला होता. शिंदे गटाचे युक्तीवाद आज सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत सुरू राहणार का?, हे पाहावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई पोहोचले आहे. आणि शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे देखील सुनावणीसाठी पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागल्याले आहे.

 

ठाकरे गटाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तीवादमध्ये नबाब रेबिया केसचा निकाल आहे. नबाब रेबिया केचा निकाल सत्तांतरवर लागू होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्षांची जी संवैधानिक सुरक्षितता आहे. ती केवळ एका नोटिसीने धोक्यात येऊ शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केले होता. यावर शिंदे गटाकडून आज हरीश साळवे युक्तीवाद करताना म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यातील कोणतीच याचिका वैध्य नाही. जशी ठाकरे गटाने न्यायालयात निलंबनाविरोधात धाव घेतली होती. त्याच पद्धतीने जेव्हा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले. जे 16 आमदार ठाकरे गटाच्या बाजूने होते, परंतु, त्यांनी व्हीपचे उल्लंघन करून त्यावेळी विरोधात मतदान केले होते. त्या आमदारांच्याविरोधात अपात्रतेची नोटीस काढली होती. जेव्हा सुनील प्रभू यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तेव्हा सुनील प्रभू यांनी सुद्धा नबाब रेबीया याच केसला हवाला दिलेला आहे. कदाचित हरीश साळवे हे आजच्या युक्तीवादा ठाकरे गट ज्या नबाब रेबीया केसाचा या प्रकरणाची संबंध नसल्याचे म्हणत आहेत. त्या केसचा आधार घेत सुनील प्रभू यांनी त्यांच्या याचिकेत केला आहे, असा युक्तीवाद हरिश साळवे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts

राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांबद्दल सेहवागने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे ‘हा’ महाराष्ट्राचा अपमान! – नाना पटोले

Aprna

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा! – नाना पटोले

Aprna