HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल पण…! । शरद पवार

मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘दैनिक लोकमत’ला काहीच दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. यावेळी राज्याच्या एकंदर राजकारणासह, प्रमुख नेत्यांबद्दल प्रश्न विचारला असताना शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. याच मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल पण त्यांची क्रेझ कायम आहे.”

“सद्यस्थितीनुसार राज ठाकरेंबद्दल कसा विचार करता?” असा प्रश्न शरद पवारांना या मुलाखतीत विचारला असता शरद पवार म्हणाले की, “निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल मात्र याचा अर्थ तरुणांमधील राज ठाकरेंची क्रेझ कायम आहे. राज ठाकरेंची क्रेझ गेलेली नाही.”

पुढे बोलताना शरद पवार असेही म्हणाले की, “राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे. आपल्या स्वातंत्र्याप्रमाणे ते आपली मत मांडत असतात. त्यांना पाठिंबा देणाऱ्या तरुणांचा एक वर्ग आहे. निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल मात्र याचा अर्थ तरुणांमधील राज ठाकरेंची क्रेझ कायम आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेंड्याच्या कातडीच्या सरकारने केलेली ही हत्याच आहे | धनंजय मुंडे

News Desk

“हाच दाऊदचा उजवा हात आणि शरद पवारांचा चेला”

News Desk

गिरीश महाजनांच्या वेगाने दोरउड्या, कार्यकर्तेही झाले अवाक!

News Desk