मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख्य यांनी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून मोदींचा खरपूस समाजार घेतला आहे. ठाकरे यांनी म्हटले की, निवडणुकांसाठी ‘राममंदिर’ पुन्हा जुमल्यांसारखे वापरणार असाल तर हिंदुत्वास खांदा देण्याची वेळ येईल. त्यामुळे राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप दाखविणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे! पंचवीस वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने असे ठरवले होते की, काही झाले तरी राम जन्मभूमीवरच मंदिर उभारायचे. मंदिर वही बनाएंगे म्हणजे बनाएंगेच! त्यासाठी अयोध्येत जे मोठे आंदोलन झाले त्यात शेकडो कारसेवकांची आहुती पडली. त्या आहुतीतूनच भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर आजचा राजमुकुट चढला आहे. मात्र आता राममंदिराचा विषय बाजूला ठेवून अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपतर्फे दिलेला हा ‘लॉलीपॉप’ आहे. हा लॉलीपॉप चघळत बसा व पुन्हा एकदा रामाच्या नावावर मतदान करा, असेच हिंदुत्ववाद्यांना सांगण्यात आले आहे.
सामनाचे आजचे संपादकीय
इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी आहेत. त्यामुळे रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने हिंदूंच्या तोंडास पुसत आहात. आम्हास बोधीवृक्ष माहीत होता, पण आता जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचा जो ‘मोदी-वृक्ष’ निर्माण झाला आहे त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येतही उडू लागली आहेत.
पंचवीस वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने असे ठरवले होते की, काही झाले तरी राम जन्मभूमीवरच मंदिर उभारायचे. मंदिर वही बनाएंगे म्हणजे बनाएंगेच! त्यासाठी अयोध्येत जे मोठे आंदोलन झाले त्यात शेकडो कारसेवकांची आहुती पडली. त्या आहुतीतूनच भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर आजचा राजमुकुट चढला आहे. मात्र आता राममंदिराचा विषय बाजूला ठेवून अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. सरकार बहुतेक सर्वच पातळ्यांवर नालायक ठरल्याने पुन्हा अयोध्येचा विषय हाती घेऊन लोकांना भ्रमित करण्याचे ठरवलेले दिसते. योगी दीपोत्सवाच्या सोहोळ्यांसाठी अयोध्येत गेले व त्यांनी दोन-तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. अयोध्येत 200 मीटर उंचीचा श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा त्यांनी केली. हा पुतळा सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा मोठा आहे की लहान हे अद्यापि ठरायचे आहे. योगी महाराजांनी आणखी एक घोषणा केली ती म्हणजे फैजाबादचे नामकरण त्यांनी ‘अयोध्या’ असे केले. फैजाबाद हा जिल्हा आहे व त्यातच रामाची अयोध्या नगरी वसली आहे. अलाहाबादचे प्रयागतीर्थ त्यांनी मागच्याच आठवडय़ात केले, पण
शहीद झालेल्या
शेकडो कारसेवकांची मागणी होती राममंदिर उभारण्याची, सरकारने मात्र दिला पुतळा व फैजाबादचे नामकरण. उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपतर्फे दिलेला हा ‘लॉलीपॉप’ आहे. हा लॉलीपॉप चघळत बसा व पुन्हा एकदा रामाच्या नावावर मतदान करा, असेच हिंदुत्ववाद्यांना सांगण्यात आले आहे. अयोध्येत राममंदिर होते, आहे आणि राहणार, असे योगींनी सांगितले याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी ही एकदम ताजी माहिती देशाला पुरवलेली आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म निश्चितपणे अयोध्येतच झाला की कसे, यावर हिंदूंच्या हिंदुस्थानात गेली अनेक वर्षे वादंग माजले आहे. बाबराने हिंदुस्थानवर हल्ला चढवला आणि अयोध्या नगरीत बाबरी मशीद वसवली. प्रभू रामचंद्र काही बाबरानंतरचे नव्हते. तरीही बाबरभक्तांचा जो आचरटपणा न्यायालयाच्या दारातही सुरू आहे तो मोडून संसदेत खास कायदा करावा आणि अयोध्येत राममंदिर बांधावे ही शिवसेनेची मागणी आहे. त्यासाठीच अयोध्येत जाऊन आम्ही सरकारकडे आग्रह धरणार आहोत. श्रीरामाचे पुतळे व मूर्ती या जगभरात भरपूर आहेत. इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी आहेत. त्यामुळे रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही
कोणत्या झाडाची पाने
हिंदूंच्या तोंडास पुसत आहात. आम्हास बोधीवृक्ष माहीत होता, पण आता जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचा जो ‘मोदी-वृक्ष’ निर्माण झाला आहे त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येतही उडू लागली आहेत. योगी महाराजांनी त्यांच्या इच्छेनुसार फैजाबादचे अयोध्या केले. रामाच्या भव्य पुतळ्याची घोषणा केली, पण मागणी आहे ती श्रीरामास अयोध्येच्या तुरुंगातून मुक्त करून त्यांना मंदिरात विराजमान करण्याची. राम आजही वनवासात आहे आणि भव्य पुतळा अयोध्येत उभारून काय करणार? हा प्रश्न लोक विचारणार आहेतच. निवडणुकांसाठी ‘राममंदिर’ पुन्हा जुमल्यांसारखे वापरणार असाल तर हिंदुत्वास खांदा देण्याची वेळ येईल. त्यामुळे राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप दाखविणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे! आता पुन्हा दिल्ली, नागपुरात व अयोध्येत संत संमेलने भरवली जात आहेत व संत सभांतून पुन्हा तेच तेच ठराव मंजूर करून घेतले जात आहेत. प्रभू श्रीरामाचे कोणी एजंट नाहीत. ते कोट्यवधी हिंदूंच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत. 25 नोव्हेंबरला आम्ही अयोध्येत पोहोचत आहोतच, पण नेमके त्याच दिवशी भाजपने अयोध्येत राममंदिरासाठी म्हणे संत संमेलन आयोजित केले. हा योगायोग समजायचा की आणखी काही? अर्थात राममंदिरासाठी सगळ्यांचेच सहकार्य आणि आशीर्वाद हवे आहेत. त्यामुळे संतांनी, महंतांनी मंचावरून मैदानात उतरावं हीच रामभक्तांची अपेक्षा आहे!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.