मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राहुल गांधी यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच संपली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण राहुल यांची पत्रकार परिषद केवळ 2 मिनिटे 47 सेकंद चालली.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. या पावणे तीन मिनिटात राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करते आहे तसेच श्रीमंतांचे खिसे भरण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला. मुख्य म्हणजे केवळ दोन मिनिट 47 सेकंद चाललेल्या या पत्रकार परिषदेत राहूल गांधींनी एकाच प्रश्नाचे लांबलचक उत्तर दिले आणि पत्रकार परिषद संपवली.
केवळ काही मिनिटांच्या या पत्रकार परिषदेसाठी राहुल गांधी यांनी जवळपास तासभर पत्रकारांना थांबवून ठेवले. यामुळे जमलेल्या पत्रकारांनी यावेळी एकत्र येवून फोटो काढले तसेच हॅश टॅग वापरत फोटो सोशल मिडीयावर टाकत पत्रकारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. जनते प्रमाण कॉंग्रेस अध्यक्षांवर माध्यम प्रतिनिधी देखील नाराज झाल्याचे चित्र आज मुंबईत पहायला मिळाले.
The most #Historic press conference of Congress President of @RahulGandhi which lasted for two min and 47 seconds! Precious moment #HistoricPC #FeelingLucky @sanjaynirupam @AshokChavanINC @RahulGandhi pic.twitter.com/0f1sgTsCRy
— pankaj dalvi (@pankaj_dalvi) June 13, 2018
Privileged to be part of the shortest PC ever (Rahul Gandhi) 2 minuets 47 seconds #HistoricPC pic.twitter.com/N3BrrB7bmi https://t.co/weK5EERtoz
— Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) June 13, 2018
२ मिनिटात मॅगी पण होत नाही, यांची पत्रकार परिषद पण संपली #HistoricPC @RahulGandhi https://t.co/tOHIzMwEkx
— Vivek Kulkarni विवेक कुलकर्णी (@Vivekjkulkarni) June 13, 2018
सकाळी 8:30 च्या पत्रकार परिषदेला 45 मिनिटे उशीरा येऊन राहुल गांधी एमसीए मधील पत्रकारांसमोर फक्त 2 मिनिटे 47 सेकंद बोलले. काँग्रेस अध्यक्षाची इतिहासातील सर्वात छोटी पत्रकार परिषद. @INCIndia #HistoricPC #RahulGandhiInMumbai #MCA #BKC #2Minute47seconds pic.twitter.com/7nVKPiddJM
— Prashant Nanaware (@nprashant) June 13, 2018
काँग्रेस अध्यक्ष @RahulGandhi यांच्या दोन मिनिटं आणि 47 सेकंदाच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार! #धन्यजाहलोरागा pic.twitter.com/kCiOBQoPYQ
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) June 13, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.