नवी दिल्ली | राफेल विमान खरेदी करारात कोणतीही अनियमितता नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर “राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली याबाबतची माहिती त्यांनी सर्वांना द्यावी”, असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शाह नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
BJP President Amit Shah: Rahul Gandhi ji should apologize to the nation for misleading people. Want to ask Rahul ji what was the source of information on basis of which he made such big allegations? #RafaleDeal pic.twitter.com/v2kSjXAait
— ANI (@ANI) December 14, 2018
“यापुढे राहुल गांधींनी असे बालिश आरोप करू नयेत”, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला आहे. “२००१ साली लढाऊ विमानांच्या मागणीनंतर २००४ साली याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान पुढे २००७ ते २०१४ सालापर्यंत याबाबतचा कोणताही करार का करण्यात आला नाही. यामागचे कारण राहुल गांधींनी स्पष्ट करावे”, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
BJP President Amit Shah:Suraj ke oopar kitna bhi keechad ya kitni bhi mitti ucchal lein vo swayam pe hi girti hai. Aage se vo(Rahul Gandhi) aise bachkaane aarop se bachein #RafaleDeal pic.twitter.com/9qfAkWZX4y
— ANI (@ANI) December 14, 2018
“राफेल करारात ऑफसेट भागीदाराची निवड करण्यात केंद्राची कोणतीही भूमिका नाही”, असेही यावेळी अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. “राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून देशातील जनतेची दिशाभूल केली असून त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी. दुर्दैवाने देशाच्या सर्वात जुन्या पक्षाकडून देशाची दिशाभूल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून सत्याचा विजय झाला आहे”, असे अमित शाह म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.