मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते की, मी शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला . माझे बोट धरुन राजकारणात आलेला माणूस इतका बदलू शकतो ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला .
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ बोरीवली येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार बोलत होते . नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की मी शरद पवार यांचा राजकीय वारसा पाहून त्यांचे बोट धरुन राजकारणात आलो आहे. त्यांनी माझं नाव खराब करु नये. माझं बोट धरुन राजकारणात आलो असं सांगून माझं नाव खराब करु नका, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणेच वागावे, असेही पवार म्हणाले .
Honourable President of NCP, Sharad Pawar ji and Shri Sachin Ahir ji addressed the meeting in Gorai. We stand together for Progress. We stand United for India. Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulagi pic.twitter.com/t4aHMUNx7f
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) April 27, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.