HW News Marathi
राजकारण

HW Exclusive | नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत जरी केली तरीही शोभणार नाही !

बुलढाणा | “मला असे वाटते की, नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत जरी केली तरीही त्यांना ती शोभणार नाही”, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना केली आहे. “मोदींची जी मूकसंमती ‘त्या’ पुस्तकाला आहे याचा अर्थ त्यांनाही खुशमस्कऱ्या केलेल्या आवडत आहेत. ‘त्या’ पुस्तकातून संघ प्रवृत्तीची मानसिकता दिसते. मात्र, छत्रपतींची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे आराध्य दैवत आहेत”, असेही अमोल मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून सध्या राज्यात निर्माण झालेल्या वादावर आमचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्याशी खास बातचीत केली.

“नरेंद्र मोदींवर मुज्जफर नगर, गोध्रा हत्याकांडसारख्या अनेक प्रकरणांचे आरोप आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींची तुलना जर करायची असेल तर लादेनसोबत करा, औरंगजेबासोबत करा, ‘तानाजी’ चित्रपटातील उदयभानसोबत करा. मोदींची तुलना जर यांच्यासोबत केली तर काही हरकत नाही”, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. “मला असं वाटतं की, जी सगळी गोयल आडनावाची लोकं आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करतात आणि भाजपसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करतो”, असा आरोपही यावेळी अमोल मिटकरी यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला आहे.

भाजपच्या एका आमदाराने तर बेशरमपणाचा कळसच गाठला !

“भाजपचे एक हाळवणकर नावाचे माजी आमदार आहेत. त्यांनी तर बेशरमपणाचा कळस गाठला आहे. ते असे म्हणाले की, मोदींमुळे शिवरायांचा सन्मान वाढला. मुळात भाजपच्या लोकांची अशी गुलामीची प्रवृत्ती असल्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात आदरच नसल्यामुळे त्यांचा हा द्वेष उफाळून येतो आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

Aprna

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

आता जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल !

News Desk