HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते त्यांच्या भाषणाने चर्चेचा विषय ठरतात. यात भाजपचे लोकसभेच्या उमेदवार मनेका गांधी यांच्या भाषणातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. मेनका गांधी यांनी मुस्लीम नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करतान धमकी वजा इशारा दिला आहे. मनेका गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

लोकसभा निवडणुकीत “मी  निश्चित जिंकून तर येणार, मात्र माझा विजय मुस्लीम जनतेशिवाय असेल तर मला वाईट वाटेल. ज्यावेळी मुस्लीम नागरिक कामानिमित्ताने माझ्याकडे येतील, त्यावेळी मला त्यांचा विचार करावा लागेल. निवडणुकीतील माझा विजय हा तुमच्या सहकार्याने होईल किंवा तुमच्या सहकार्यशिवाय होईल, असे मनेका गांधी यांनी एक प्रचार सभेत म्हटले आहे.

मेनका गांधी यांनी पुढे असे देखील म्हटले की, “मी तुमच्याकेड मैत्रीचा हात पुढे केला आहे. मी पिलिभीतमध्ये कसे काम केले आहेत, तेथील लोकांना विचारा. मी चांगले काम केले नसेल तर मला मतदान करु नका. मी जिंकणारच आहे, त्यामुळे तुम्हाला माझी भविष्यात गरज पडणार आहे”, असे वक्तव्य मनेका गांधी यांनी केले आहे. मनेका गांधी यंदा आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या नाही. मुलगा वरुण गांधी यांच्या सुल्तानपूर मतदारसंघातून त्या मैदानात उतरल्या आहेत. तर वरुण गांधी मनेका यांच्या पिलीभितमधून वरुण गांधीना तिकीट देण्यात आले आहे.

Related posts

अजित पवार यांचे सामनाच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर

News Desk

शिवसेनेवर टीका करणे किरीट सोमय्या यांना महागात पडणार का ?

News Desk

अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादीत मतभेद ? 

News Desk