May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही !

पुणे | “माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही. ईव्हीएममध्ये जर दोष असता तर ५ राज्यांमध्ये भाजपचे सरकार गेले नसते. ईव्हीएमबाबत काहींच्या मनात अजूनही शंका आहे. मात्र, ही शंका लोकशाहीसाठी मारक आहे”, असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते.
“केवळ व्हिडिओ कॉन्फरसिंग करून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत पोहोचणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देणे गरजेचे आहे. मात्र, भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाण्यास घाबरत आहेत. कारण त्यांचे अधिकारी केवळ आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. त्यांच्या अनेक जण तर परदेश दौ-यावर गेले आहेत. राज्य सरकारकडून प्रत्येक गोष्टीसाठी अट घालण्यात येत आहे. हे अटींचे सरकार आहे”, अशी टीका देखील यावेळी अजित पवार यांनी केली आहे.
राज्य सरकारकडून आरक्षणाला अट, दुष्काळग्रस्त भागांत चारा छावण्यांना अट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाला अट घातली जात आहे. यातून कोणाचेच भले होणार नाही, असेही अजित पवार यावेळी म्हटले आहे. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या रडारसंदर्भातील वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया देत हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

Related posts

मोदी म्हणतात, एक दिवस पर्यटक भारतातील शौचालये पाहण्यासाठी येतील

News Desk

मध्य प्रदेशात सशस्त्र पोलीस बंदोबस्तात खत पुरवठा

News Desk

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk