HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मला राज ठाकरे यांची सध्याची परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटते !

मुंबई | “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्याची परिस्थिती बघून मला अतिशय वाईट वाटते. त्यांनी मनसेच्या व्यासपीठावरून अन्य पक्षांचा प्रचार करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे आहे”, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले आहे. मनसे आगामी लोकसभा लढविणार नसल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, राज ठाकरे आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी राज्यभरात तब्बल ८ ते ९ सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता

  • सातारा – उदयनराजे भोसले
  • सोलापूर – सुशिलकुमार शिंदे
  • नांदेड – अशोक चव्हाण
  • ठाणे- आनंद परांजपे
  • नाशिक – समीर भुजबळ
  • पिंपरी-चिंचवड- पार्थ पवार
  • बारामती – सुप्रिया सुळे
  • उत्तर मुंबई – ऊर्मिला मातोंडकर
  • ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
  • उत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त

Related posts

Breaking News : राफेल डीलची याचिका न्यायालयात रद्द, काँग्रेसला मोठा धक्का

News Desk

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला | मनमोहन सिंग

Shweta Khamkar

आगामी निवडणुकांसाठी प्रशांत किशोर देणार का शिवसेनेला साथ ?

News Desk