HW News Marathi
राजकारण

मी नेहमीच ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’च्या घोषणा देत राहिलो !

मुंबई | “भाजपवाले सध्या माझा २ वर्षांपूर्वीचा आमच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल करत आहेत. यावेळी आम्ही पक्षाचे सर्व नेते रायगड किल्ल्यावर गेलो होतो. त्यावेळी, फोटो काढण्यासाठी आम्ही एकत्र, जवळ-जवळ उभे राहिलो होतो. त्यावेळी, धनंजय मुंडेंनी ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ अशी घोषणा दिली. त्यावेळी, सर्वजण ‘जय’ म्हणाले. मी पण ‘जय’ म्हणालो होतो. पण, मी हात वर केला नव्हता. मात्र, भाजप कुठेतरी याच गोष्टीचा दुष्प्रचार करत आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. “प्रचारावेळीही मी ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’च्या घोषणा देत राहिलो”, असेही नवाब मलिक यांनी यावेळी म्हटले.

“शिवभोजनच्या कार्यक्रमालाही छत्रपती शिवाजी महाराज कि जय म्हणून मीच कार्यक्रमाचे उदघाटन केले. आता भाजपवाल्यानी मला एकच उत्तर द्यावे कि, तुमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता ? याचे उत्तर जनतेलाही अपेक्षित आहे”, असा बोचरा सवाल यावेळी नवाब मलिक यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे नवाब मलिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. रायगडावरील या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत असताना मलिक मात्र गप्प असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे उपस्थित सर्व नेते यावेळी शिवरायांच्या नावाने ‘जय’ म्हणताना दिसत असताना मलिक मात्र शांत असल्याचे दिसत आहे.

अमेय खोपकरांकडून नवाब मालिकांच्या राजीनाम्याची मागणी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, अवधूत तटकरे, विद्या चव्हाण, माजी मंत्री फौजिया खान यांसह अन्य नेतेही दिसून येत आहेत. दरम्यान, नवाब मलिकांचा हा जवळपास २ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये, त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप प्रवक्ते राम कदमांनी मालिकांवर जोरदार टीका केली. त्याचप्रमाणे, मनसे नेते अमेय खोपकर यांनी नवाब मालिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

swarit

#LokSabhaElections2019 : पहिल्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk

ठाकरे, मुनगंटीवार भेट तुर्तास रद्द

News Desk