HW News Marathi
राजकारण

मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही! – उद्धव ठाकरे

मुंबई | “मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही,” मुख्यमंत्री पदावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि 34 आमदारांनी पक्षासोबत बंडखोरी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज (22 जून) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेसह बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली. “माझ्या पक्षातील लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला तयार आहे,” असे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, “मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला खेचू शकत नाही आणि अडवू शकत नाही. पण हे माझ्या समोर येवू बोला उगाच शिवसेनेची गद्दारी करणार नाही. पण ही शिवसेना आणि ही शिवसेना तुम्ही कशाला हे करत आहात. या सर्ववरून कोणाचे नुकसान होत आहे.”

मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवेन

मी मुख्यमंत्री पदावरून उठतो. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो. त्यांच्यापैकी एकाही आमदारांनी मला सांगितले. किंवा त्यांनी जर स्टेटमेंट दिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर नको, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला तयार आहे. जर त्यावर विश्वास नसेल तर आज आपले फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज सांध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहेत.”

संबंधित बातम्या

“मी मुख्यमंत्री पदी नको, समोर येऊन सांगा मग…,” मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन

 

Related posts

काँग्रेस पक्षाचे काय होणार, हा प्रश्नच आहे !

News Desk

काँग्रेसच्या सचिव पदी अभिनेत्री नगमा यांची वर्णी

swarit

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

News Desk