HW News Marathi
राजकारण

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

रत्नागिरी | महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील सिंधुदुर्गसह इतर मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविणार आहे . एनडीएमधील आम्ही घटक पक्ष असल्याने आमचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे . मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना आमचा शेवट पर्यंत विरोध राहील , खासदार नारायण राणे यांनी दिली . कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी खासदार नीलेश राणे यांची उमेदवारी महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे आम्ही जाहीर केली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पािठबा द्यावा. यासाठी या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची आम्ही चर्चा करीत आहोत . राज्यात शिवसेना आणि भाजप या पक्षातील फक्त नेत्यांमध्ये युती झालेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही नाराजी आहे . त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपचे कार्यकत्रे विरोधात मतदान करतील, तर जेथे भाजपचा उमेदवार असेल तेथे शिवसेनेचे कार्यकत्रे विरोधात मतदान करतील. याचा फायदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना होईल , असेही राणे म्हणाले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सध्या ‘भारतीय विरुद्ध काश्मिरी’ असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्नात !

News Desk

व्हायरल फोटोबाबत श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…

Aprna

रुपाली ठोंबरेंनी फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी नेमक्या काय म्हणाल्या…

Aprna