HW Marathi
राजकारण

‘हे’ तात्पुरत्या स्वरूपाचे खातेवाटप !

मुंबई | अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकासाआघाडीची सत्ता स्थापन झाली. २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या प्रत्येकी २-२ नेत्यांची मंत्रिपदाची शपथ शपथ घेतली. मात्र, या ६ मंत्र्यांची खाती गुरुवारी (१२ डिसेंबर) म्हणजेच या शपथविधीनंतर तब्बल १४ दिवसांनी जाहीर झाली आहेत. मात्र, ‘हे’ खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे आता राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिल्याने आता ते या खातेवाटपावर नाराज असल्याची देखील चर्चा रंगत आहे.

“माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल”, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, गुरुवारी जाहीर झालेल्या महाविकासाआघाडीच्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम ही खाती आली आहेत. तर राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा ही खाती आली आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण ही खाती आली आहे.

सुरुवातीपासून खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गृह खाते मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेकडून गृह आणि नगरविकास खात्यावर दावा सांगण्यात येऊ लागला. तरीही राष्ट्रवादी गृह खात्यावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती मिळत होती. मात्र, आता अखेर राष्ट्रवादीला वगळून गृह खाते शिवसेनेला मिळाले आहे. यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts

शाहरुख खाननी महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना अशी केली मदत

News Desk

पंतप्रधान मोदी चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाहीत

धनंजय दळवी

किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न मिळाले ?

News Desk