HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘संतोष बांगर पुन्हा निवडून आल्यास मी माझी सर्व संपत्ती दान करेन’; युवासेना कार्यकर्त्याचं आव्हान

प्रतिनिधी/शिवशंकर निरगुडे

हिंगोली | राज्यातील सत्तांतराच्या घटनेवेळी शिंदे गटाचे काही आमदार चांगलेच चर्चेत आले. त्यामध्ये, सांगलीचे आमदार शहाजी बापू पाटील आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे लोकांच्या अधिक लक्षात राहिले. कारण, संतोष बांगर हे अगोदर रडले होते, शिंदे गटाच्या आमदारांना त्यांनी एक प्रकारे शाप दिला होता. मात्र, अखेर तेच शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे, संतोष बांगर चांगलेच चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कँटीन व्यवस्थापकाला कानाखालीही लगावली होती. त्यावरुन ते चर्चेत असतानाच, युवासेनेच्या एका कार्यकर्त्याने त्यांना चॅलेंजच केलं आहे.

हिंगोलीतील युवासेनेचे कार्यकर्ता असलेल्या दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना निवडणुकीचं आव्हान दिलं आहे. ‘माझं आव्हान आहे की, संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं. पण, त्यांच्यात हिंमत नाही. भविष्यात जेव्हा केव्हा पुढची निवडणूक लागेल, तेव्हा त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. जर ते निवडून आले, तर माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी मी दान करायला तयार आहे, असं चॅलेंजच घुगे यांनी दिलं आहे. दरम्यान, तसं झाल्यास मी भिक्षा मागून खाईन, असेही कार्यकर्ता घुगे यांनी म्हटले आहे.

हिंगोलीत शिंदे गटाचा ना आमदार निवडून येईल, ना खासदार असा दावाही त्यांनी केला आहे. येथील खासदार देखील पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, जर बंडखोर गटातील खासदार पुन्हा निवडून आले, तर माझ्या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांकडून मी एकेक रुपया जमा करेन आणि १ लाख लिटर दुधाचा अभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करेन, असं चॅलेंज घुगे यांनी बांगर यांना केलं आहे. तसेच, सध्या तुमची सत्ता आहे, ती जास्त डोक्यात जाऊ देऊ नका. लोकांची विकास कामं करा. गरीबांना मदत करा, असा उपरोधात्मक सल्लाही दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा;शहिदांना अभिवादन 

News Desk

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कर चुकविणाऱ्‍यांविरूद्ध विशेष मोहीम; सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक

Aprna

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

News Desk